Access the official alumni network of Annasaheb Awate College on mobile

AAC Alumni Network is the Mobile App that allows you to access your official alumni network alumni.aacmanchar.edu.in on Mobile. You can search alumni, view profiles, start conversations and connect with all your alumni on the go.Note: You need to be a registered member on alumni.aacmanchar.edu.in to be able to access the app

आवाहन

     उत्तर पुणे जिल्ह्यातील रयत शिक्षण संस्थेचे अण्णासाहेब आवटे महाविद्यालय,मंचर हे आपले सर्वात जुने व नावाजलेले, डोंगर माळरानावर वसलेले, हिरवाईने नटलेले महाविद्यालय सन १९६६ साली स्थापन झाले आहे. या महाविद्यालायाचा माजी विद्यार्थी संघ, “अण्णासाहेब आवटे, हुतात्मा बाबू गेनू, कुसुमबेन शाह माजी विद्यार्थी संघ” मंचर या नावाने गेली २० वर्ष कार्यरत आहे. पद्मभूषण कर्मवीर अण्णांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना करून खेडोपाडी गरीब व शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची सोय केली. त्यासाठी त्यांनी अनेक माजी विद्यार्थी व लोकसहभागातून आर्थिक मदत उभी करून गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना शिक्षण दिले. नुकतीच रयत शिक्षण संस्थेने शताब्दी साजरी केली. त्यांनी स्थापन केलेल्या या महाविद्यालयामध्ये आंबेगाव, खेड, जुन्नर परिसरातील अनेक विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी मिळाली.
सर्व माजी विद्यार्थी मित्रहो...
     आपण विद्यार्थी दशेत अण्णासाहेब आवटे महाविद्यालयात शिक्षण घेऊन सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, विज्ञान नोकरी, उदयोग व्यवसाय अशा वेगवेगळ्या क्षेत्रात उत्तम प्रकारे कार्यरत आहात. आवटे महाविद्यालय नसते तर..... थोडा विचार केला तर आपल्या शिक्षणात अनेक अडचणी आल्या असत्या हे लक्षात येते. तुम्ही जिथे आहात तिथे उत्तम काम करत असाल, त्यामुळे तुम्हाला गौरविले असेल याचा आम्हला सार्थ अभिमान आहे. २००२ सालापासून कार्यरत असलेल्या माजी विद्यार्थी संघाने उभ्या केलेल्या निधीतून विद्यार्थ्यांच्या आरोग्य ,शिक्षण, गुणवत्ता वाढ, शिष्यवृत्ती या सारख्या उपक्रमातून महाविद्यालयात अनेक भौतिक सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.
१) महाविद्यालयाची जिमखाना इमारत उभारणी,
२) पिण्यासाठी स्वच्छ व निर्जंतूक पाणी प्रकल्प
३) वृक्ष लागवडीसाठी आर्थिक मदत
     तसेच यावर्षी महाविद्यालयातील वनशेती विकास व मशागतीसाठी ट्रॅक्टर स्वराज orchard ( २६.५ H.P ) ५ लाख २५ हजार रुपये खरेदीस आर्थिक मदत करीत आहोत. यामुळे महाविद्यालयाच्या वैभव संपन्न जडणघडणीत व प्रगतीस आपला हातभार लागणार आहे. यापुढे आपण Google Play Store वर 'AAC Alumni Network' या नावाने Android Application डिझाईन केला असून या तांत्रिक माध्यमाच्या द्वारे मोठ्या संख्येने माजी विद्यार्थ्यांचे संघटन करण्याचा मानस आहे. भविष्यात महाविद्यालयाला साजेसे प्रवेशद्वार उभारणीसाठी आपण अर्थसाहाय्य करणार आहोत. तरी App वरील माजी विद्यार्थी संघाची आपण माहिती घ्यावी. आपल्या संपर्कातील मित्रांना, नातेवाईकांना संघाशी जोडावे. आपल्या मदतीच्या हातांनी सामाजिक कार्याबरोबर परिसरातील गरीब, गरजू, होतकरू, विद्यार्थ्यांना त्याचा लाभ होईल. भविष्यातील महाविद्यालयाच्या गतिमान प्रगतीसाठी ज्ञानयज्ञास साथ देण्याचे आवाहन आपणास करण्यात येत आहे.
आपण आपली मदत माजी विद्यार्थी संघाच्या Online App किंवा समक्ष महाविद्यालयात येऊन देऊ शकता.
A/C Name: Annasaheb Awate Hutatma Babugenu Kusumbe
Bank A/C No. 41508989648
IFSC Code: SBIN0004929
Bank : State Bank Of India (Manchar).

माजी विद्यार्थी संघ
अण्णासाहेब आवटे कॉलेज, मंचर

प्राचार्य
अण्णासाहेब आवटे कॉलेज, मंचर

featured project

प्रा. मधुकर वाघ

 • संस्थापक अध्यक्ष


featured project

श्री सुरेश भोर

 • अध्यक्ष


featured project

प्रा. बळवंत दाते

 • खजिनदार


featured project

प्रा. कैलास एरंडे

 • सचिव


featured project

प्रा. प्रल्हाद काळे

 • सदस्य


featured project

प्रा. हंसराज थोरात

 • सदस्य


featured project

श्री डी. के. वळसे

 • सदस्य


featured project

सौ. स्मिता धुमाळ

 • सदस्य


featured project

श्री बाळासाहेब वाघ

 • सदस्य


featured project

सौ. कदम विजया

 • सदस्य


featured project

प्रा. राजेंद्र भोर

 • निमंत्रित सदस्य